HW News Marathi
महाराष्ट्र

‘हा टाइमपास कशाला?’, निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

मुंबई | भाजप नेते निलेश राणे हे नेहमीच विरोधकांवर टीका करत असतात. आता त्यांनी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाचा धागा पकडून नीलेश राणे एक ट्वीट केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे.

काय आहे ट्विट?

निलेश राणे यांनी सुप्रिया सुळें विरोधात ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे. केंद्र सरकारनं एम्पिरिकल डेटा द्यावा, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. हीच मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये ३७७ अंतर्गत केली. नीलेश राणे यांनी त्यावरूनच सुळे यांना टोला हाणला आहे. ‘३७७ अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देत नाही. तशी तरतूदच नाही. मग ह्या अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाईमपास कशाला?,’ असा सवाल नीलेश राणे यांनी केला आहे.

याआधी शरद पवारांवर टीका

निलेश राणेंनी याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणावरून टीका केली होती. रोहित पवार यांनी या टीकेला उत्तर दिल्यामुळं या दोन्ही युवा नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगलेला महाराष्ट्रानं पाहिला आहे. त्याशिवाय, अलीकडंच नीलेश राणे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. ‘अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे, पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे अर्थतज्ञ देखील सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं. अर्थमंत्री असूनही त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही,’ असं नीलेश राणे म्हणाले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायन रुग्णालय आंदोलन प्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

News Desk

‘ICHR ने पंडित नेहरुंचं चित्र वगळलं’, त्यावर संजय राऊत म्हणाले….

News Desk

चंद्रकांत पाटील, दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता, त्यामुळेच मुख्यमंत्री बोलले; राष्ट्रवादीचं मोठं विधान!

News Desk