HW News Marathi
महाराष्ट्र

“मतं मागायला आल्यावर पायतान घेऊन उभे रहा”, पडळकरांचा सल्ला

मुंबई | भाजप नेते गोपीचंद पडळकर हे सध्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीकरिता प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान पडळकर महाविकासाआघाडीवर चांगलंच तोंडसुख घेत आहेत. त्यातच आता पडळकरांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे. आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून झालेल्या गोंधळावर भाष्य करताना “भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे आर्थर रोड तुरुंगात असतील”, असा दावाच गोपीचंद पडळकरांनी केला आहे. फक्त राजेश टोपीचा नव्हे तर यावेळी पडळकरांनी आणखी काही मंत्र्यांवरही टीकेची संधी साधली आहे.

“मतं मागायला आल्यावर पायतान घेऊन उभे रहा”, असा सल्ला पडळकरांनी लोकांना दिला. नांदेडमधील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पडळकर यांनी राज्याचे सार्वजनिक धकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधत हे लक्ष्य केलं आहे. त्याचसोबत, यावेळी पडळकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही डिवचलं आहे. “जनाब संजय राऊत”, असा उल्लेख करत टीका करताना पडळकर म्हणाले की, “शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. तुमच्यासारख्या भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही”

…तेव्हा तुमच्या हाताला काय लकवा मारतो काय?

“जनाब राऊत, तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरुन उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान आणि औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरुन उस्मानाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक होते. अशावेळी एरवी उस्मानाबादला धाराशीव करु म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय?” असा सवालही पडळकर यांनी राऊतांना केला.

‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’

“संजय राऊतांनी ओवीसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या ईदीचा नजराणा तुम्ही पेश केला. सत्तेसाठी तुम्ही अमरावती मनपातसुद्धा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यामुळे, आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांनी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार सुभाष णे यांच्याकरिता कारेगाव, बळेगाव, करडखेल इ. ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. यावेळी ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांच्या शुभेच्छांनंतर मुख्यमंत्र्यांची भावनिक प्रतिक्रिया

News Desk

आम्ही सरकार एकत्र चालवतो याचा अर्थ पक्ष एकत्र चालवतो असा होत नाही!

News Desk

शरद पवारांनी बोलावली बैठक, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निर्णय

News Desk