HW News Marathi
महाराष्ट्र

अमृता फडणवीसांच्या आमदारकीसाठी भाजपमध्ये दबावतंत्र, शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स पाठवूनही ते हजर राहिलेले नाहीत. त्यांच्या वास्तव्याबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याचे दिसून आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर अतिशय खोचक अशा शब्दात टीका केली होती. अनिल देशमुखय हनिमूनला गेलेत की काय ? असा प्रश्न त्यांनी केला होता. पण या टिकेला आता शिवसेनेकडून उत्तर आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या निमित्ताने शिवसेनेने पलटवार केला आहे. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्या टिकेला उत्तर देत प्रत्युत्तर दिले आहे. तर भाजपमध्ये अमृता फडणवीस यांच्या आमदारकीसाठी प्रचंड दबाव निर्माण केला जात असल्याचा गौप्यस्फोटही शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा आहेत

अमृता फडणवीस यांच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील टिकेचा मनिषा कायंदे यांनी थेट शब्दात समाचार घेतला आहे. तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा आहेत. या तपास यंत्रणांमधून तुम्ही अनिल देशमुख यांना शोधू शकता ना? असा प्रश्न मनिषा कायंदे यांनी केला आहे. त्यासोबतच अमृता फडणवीस यांची भाजपमधील अस्वस्थताही त्यांनी बोलून दाखवली.

अमृता वहिनींना भाजपमधून आमदारकी हवीये

भाजपवर सामनातून टीका होत असते. पण सामनाचे अग्रलेख वाचण्यासाठी विचाांची शक्ती लागते, ती तुमच्याकडे नाही. त्यामुळेच सामनातून भाजपवर टीका झाली की अमृता वहिनी या अस्वस्थ होताना दिसतात. अमृता वहिनींना भाजपमधून आमदाकी हवेय, तसेच प्रवक्ते पद हवेय. त्यामुळेच भाजपमध्येही तुमच्या आमदारकीसाठी प्रचंड दबाव तुम्ही आहात.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

अमृता फडणवीस सध्या तपास यंत्रणांना हव्या असलेल्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निमित्ताने प्रतिक्रिया दिली. एक पोलिस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहित नाही. पण हे व्हायला नको ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना. अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी टीका केली होती. महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचे समर्थनही त्यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत स्वतंत्र विचारांचा देश | प्रणव मुखर्जी

News Desk

शरद पवार हे महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ,ऊर्मिला मातोडकरांकडून शुभेच्छा!

News Desk

नारायण राणेंची तब्येत बिघडली!

News Desk