HW News Marathi
महाराष्ट्र

यामुळे त्या लोकांना सोडून देण्यात आले- एनसीबी

मुंबई | मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा या कारवाईत सहभाग असल्याचा आरोप केला. यानंतर आता एनसीबीने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. एनसीबीने यात सुरुवातीला या प्रकरणात कशी कारवाई झाली याची माहिती दिली आणि शेवटी एनसीबीवरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत फेटाळून लावले.

सखोल चौकशीनंतर यापैकी ८ जणांना अटक करण्यात आले

या कारवाईत एकूण ९ स्वतंत्र साक्षीदार आहेत. मनिष भानूशाली आणि के. पी. गोसावी हे त्यापैकीच आहेत. या कारवाईआधी एनसीबीवरील दोन साक्षीदारांसह ९ जणांना ओळखत नव्हते. हायप्रोफाईल व्यक्तींना अटक झाल्यामुळे या प्रकरणातील कोणतीही माहिती बाहेर लिक होऊ नये, यासाठी संबंधित आरोपींना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. याबाबतची माहिती न्यायालयातही माहिती देण्यात आली. आतापर्यंत १४ जणांची चौकशी करण्यात आली असून सर्वांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सखोल चौकशीनंतर यापैकी ८ जणांना अटक करण्यात आले आणि इतरांना सोडून देण्यात आले, अशी माहिती एनसीबीने दिली.

एनसीबी अधिकाऱ्याने म्हटले, एनसीबीवर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि पूर्वग्रहदुषित आहेत. अनेक वक्तव्य ही केवळ गृहितकांवर आधारित आहेत. एनसीबीची कारवाई आणि त्यासाठीच्या प्रक्रिया या कायद्याला धरुन आणि पारदर्शक आहेत आणि असतील. सर्व संशयित आणि आरोपींसोबत कायद्यानुसारच वर्तन केलं जाईल. आपल्या कारवाईत दोन साक्षीदारांचाही समावेश एनसीबीला करावा लागतो. या साक्षीदारांची माहिती मिळवणे आणि तपासणी करणे अवघड असते. कारण त्यावेळी आमचा प्रमुख उद्देश ड्रग्ज जप्त करणे आणि कारवाई करण्यावर असतो. या कारवाईत एकूण ९ साक्षीदार सहभागी झाले. यात मनिष भानूशाली आणि के. पी. गोसावी यांचाही समावेश होता. २ ऑक्टोबरच्या कारवाईआधी या सर्व साक्षीदारांना एनसीबी ओळखत नव्हती.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

News Desk

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंच्या कार्यालयावर ईडीची धाड

News Desk

भिमाकोरेगाव हिंसाचाराची साक्षिदार पूजा सकट हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी

News Desk