HW News Marathi
महाराष्ट्र

‘आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती उत्तम,’ जयंत पाटलांची माहिती!

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, ते मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये रवाना झाले होते. आले. जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. जयंत पाटील यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली होती. अजित पवारांच्या दौऱ्यातही ते सोबत होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूरनुकसानीची माहिती दिली होती.

जयंत पाटलांनी दिली ट्विट करून माहिती

आज मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना, जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र आता खुद्द जयंत पाटील यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. अशा पद्धतीचे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

पूरस्थितीच्या काळात यंत्रणांना सूचना

सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूरस्थितीच्या काळात यंत्रणांना सूचना देत पाहणी केली होती. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठची गावं आणि सांगली शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं. अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने, पाण्यात बोटीचा वापर करत जयंत पाटलांनी सांगलीतील पूरस्थितीची दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांना धीर दिल्याचं पाहायला मिळालं होतं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येचे निमंत्रण आले असते तरी मुख्यमंत्री गेले असते का? कारण सध्या त्यांची फजिती झाली आहे – गिरीष महाजन

News Desk

आजपासून भरता येणार बारावीच्या परीक्षेचे अर्ज

News Desk

महसुली विभाग वाटप नियम 2015 मध्ये सुधारणा

News Desk