HW News Marathi
महाराष्ट्र

‘तळीयेत अजूनही लोकं बेपत्ता, शोधकार्य सुरूच’, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती….!

महाड। महाडच्या तळीये गावात 35 जणांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला 24 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 35 महिला, 10 मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफच्या तीन पथकाच्या सहाय्याने या ठिकाणी मदतकार्य सुरू असून बेपत्ता गावकऱ्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. ही घटना अकल्पनीय आणि अनेपक्षित होती, असेदेखील जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

35 महिला, 10 मुलं बेपत्ता

महाडच्या तळीये येथील दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी या आज घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. तळीयेच्या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेतील 50 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 35 महिला, 10 मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. तसेच बेपत्ता ग्रामस्थांचाही शोध घेतला जात आहे.

राज्य आणि केंद्राकडून मदत

असं सांगतानाच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखाची तर पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार जखमीवर मोफत उपचार करणार आहे, असं चौधरी यांनी सांगितलं.

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पोहोचू शकत नव्हतं

सायंकाळी 5.30 वाजता ही घटना घडली. आम्हाला या घटनेची माहिती सायंकाळी 6.39 वाजता मिळाली. पण महाडला महापूर होता. त्यामुळे या गावाकडे येण्याचे सर्व मार्ग बंद होते. आम्ही नेव्ही आणि एअरफोर्सच्या संपर्कात होतो. एनडीआरएफच्याही संपर्कात होतो. पण खराब हवामान आणि पुरामुळे मदत पोहोचू शकली नाही. रोड ब्लॉक होते. तसेच खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पोहोचू शकत नव्हतं. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांना मदत करू शकलो नाही. मात्र, स्थानिकांनी या ठिकाणी बचावकार्य करत 31 मृतदेह बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी रस्ते उघडल्यानंतर एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं.

तळीयेचा समावेश नव्हता

आम्ही जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांची यादी तयार केली होती. ज्या 9 गावांना दरड कोसळण्याचा प्रचंड धोका आहे, त्या गावांच्या यादीत तळीयेचा समावेश नव्हता. तसेच दरड कोसळण्याची शक्यता, सौम्य शक्यता असणाऱ्या गावांच्या यादीतही तळीयेचा समावेश नव्हता. तरीही ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना अत्यंत अनाकलनीय आणि अनपेक्षित अशीच होती, असं त्यांनी सांगितलं. पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याला सहा दिवसांपासून रेड अॅलर्ट देण्यात आला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय घडलं?

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकर्‍यांच्या मदतीला सरकारी ठेंगा ,भाजप कार्यकर्त्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

News Desk

HW Exclusive Tatya Lahane | कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या बाबी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घ्या…

swarit

मराठी भाषा ही ज्ञानभाषा असायला हवी – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk