HW News Marathi
राजकारण

चिमुरडीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला

हैदराबाद | हैदराबादमध्ये अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर एकच खळबळ उडालीय. याचं कारण म्हणजे, राज्य सरकारमधील एका मंत्र्यांकडून आरोपीला शोधून काढून एन्काऊन्टर करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेल्या मृतदेहावरील टॅटूचे निशाण आणि इतर ओळखीनंतर हा बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याची ओळख पटलीय. तेलंगणा पोलिसांकडून या आरोपीला शोधून कढण्यासाठी १० लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं.

बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी फरार होता

तेलंगणा पोलीस महासंचालकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. ही जागा घानपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. मृताच्या शरीरावर मिळालेल्या निशाणीवरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय. या ट्विटमध्ये पोलिसांनी रेल्वे रुळावर आढळून आलेल्या मृतदेहाचे काही फोटोही शेअर केले आहेत. आरोपीनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज हैदराबाद पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी व्यक्त केलाय. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी फरार होता. ३० वर्षीय आरोपीचं नाव पल्लाकोंडा राजू आहे.

आरोपीला शोधून काढण्यासाठी आरोपीच्या फोटोसोबतच त्याची ओळख पोलिसांनी जाहीर केली होती. लांब केस, हातांवर टॅटू, गळ्यात स्कार्फ आणि शरीरावरील काही आभूषणांवरून पोलिसांनी त्याची ओळख पटवलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्नाटक दौऱ्यातील काळ्या बॉक्समध्ये दडलेय तरी काय ?

News Desk

चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार, त्यांना शुभेच्छा : संजय राऊत

News Desk

शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप

News Desk