HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज मोठी बैठक

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रीमंडळात येत्या २-३ दिवसांत मोठे फेरबदल केले जाणार आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज (६ जुलै) सायंकाळी मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. तसेच मंत्र्यांनी काय कामे केली याचाही त्यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला होता. २० जूनला त्यांनी या नेत्यांची बैठक घेतली होती. यामध्ये २ वर्षांत काय कामे केली याची माहिती केली होती.

मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा विस्तार याच आठवड्यात किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. हा विस्तार ७ किंवा ८ जुलैला होणार असल्याचं म्हटलं जात आहे.. चांगले काम न करणाऱ्या मंत्र्यांना हटविले जाणार आहे. तर नव्या दमाचे जवळपास २२ नेत्यांना या विस्तारात संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

याचबरोबर काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकार-२ ला दोन वर्षे होऊन गेली आहेत. यामुळे आगामी पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या त्या समाजाचे नेते, राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता आहे.

नारायण राणे दिल्लीत!

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलानंदेखील भाजपची साथ सोडली. त्यामुळे दोन मंत्रिपदं रिक्त झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेलं मंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसचं आंदोलन पेटलं, प्रियांका गांधींना घेतलं ताब्यात

News Desk

राम रहिमला कोर्टातून गायब करण्याचा कट, तीन पोलिस कर्मचारी कटात सहभागी, तिघाना अटक

News Desk

भारतात दोन ‘कोरोना’बाधित रुग्ण सापडले

swarit