मुंबई । महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमेकांच्या भेटीगाठींचं सत्र सध्या सुरू असल्याचं चित्र आहे. आणि बैठकांमधून सांगितलं जाते की कुठलेच मतभेद नाही, तर दुसरीकडे महविकास आघाडीतील आणखी एक घटक पक्ष नाराज झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नसल्यामुळे नाराज झाले आहेत. अबू आझमी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नाही. आदित्य ठाकरे सुद्धा जनतेच्या प्रश्नावर भेट देत नाही. गणपती उत्सवाला वेळ आहे तरी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. पण बकरी ईद जवळ आली असतानाही नियमावली जाहीर करत नाही, असं म्हणत अबू आझमींनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
मुस्लिम लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी महाविकास आघाडीतील पक्ष करत होते. पण आता स्वतःच सरकार आले तरी काही करत नाही, अशी खंतही आझमींनी बोलून दाखवली. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्यांच्या मनाला येईल तसे अधिकारी भिवंडीत बदलतात. आम्ही जनतेच्या प्रश्नावर भेट मागतो तर हे फोन पण उचलत नाही’ असा आरोपही अबू आझमीं कडून करण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेड कडून थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बंगल्यासमोर ठिय्या…!
मराठा आरक्षणावरुन मराठा समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. आदित्य ठाकरे यांनी भेटीची वेळ न दिल्यानं संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकरत्यांनी थेट आदित्य ठाकरेंच्या शासकीय बंगल्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु आदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मराठा समाज तसेच ओबीसी आरक्षणाला संरक्षण द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भेटीची वेळ मागितली होती. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भेट मागितील होती. परंतु आदित्य ठाकरे यांनी भेट दिली नाही. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्रालयालगत असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या शासकिय निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. कार्यकर्त्यांनी बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन करत मोठ्याने घोषणाबाजी केली. यावेळी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.