नवी दिल्ली | देशात थैमान घातलेल्या करोनाच्या लाटेला ओहोटी लागली आहे. देशात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. देशात ४६ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात एक मोठा दिलासा म्हणजे कोरोनामुळे होत असल्येल्या मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. करोनाची दुसरी लाटे शिगेवर पोहोचल्यानंतर देशात दररोज साडेतीन हजार ते साडेचार हजार या सरासरीने मृतांची नोंद झाली होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून मृतांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली होती. तीन महिन्यांनंतर मृतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.
गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार १४८ नवी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५८ हजार ५७८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे.
India reports 46,148 new #COVID19 cases, 58,578 recoveries and 979 deaths in the last 24 hours as per the Union Health Ministry
Total cases: 3,02,79,331
Total recoveries: 2,93,09,607
Active cases: 5,72,994
Death toll: 3,96,730Recovery rate: 96.80% pic.twitter.com/po62eUmMhC
— ANI (@ANI) June 28, 2021
महाराष्ट्रात कोरोनाचे ९,९७४ नवे रुग्ण
राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ९,९७४ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात १४३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या १ लाख २२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात रायगड ६७२, पुणे जिल्हा ५८७, पुणे शहर २८६, पिंपरी-चिंचवड ३८६, सातारा ९२९, कोल्हापूर १५२५, सांगली १२०५, सिंधुदुर्ग ५०८, रत्नागिरी ५८३ नवे रुग्ण आढळले. विदर्भ आणि मराठवाडय़ातील रुग्णसंख्येत घट झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.