HW News Marathi
महाराष्ट्र

ताज हॉटेलमध्ये दहशतवादी घुसल्याचा फोन, मुलाची गंमत, पोलिसांची धावपळ

मुंबई | मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये काल (२६ जून) आलेल्या एका अफवेच्या फोनमुळे हॉटेल प्रशासन व तेथील सुरक्षा यंत्रणांची काही काळ धावपळ उडाली. फोननंतर पोलिसांनी परिसर धुंडाळून काढला. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही. दुपारी ३.३० च्या सुमारास मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोबाइलवरून फोन करून ‘हॉटेलच्या पाठीमागच्या दरवाजातून दोन अतिरेकी एके ४७ रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ अशी माहिती देऊन खळबळ उडवणारा मुलगा हा अल्पवयीन असून, गंमत म्हणूनच त्याने हा फोन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले की, कऱ्हाडमधील नववीत शिकणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाने हा दूरध्वनी केला होता.

हॉटेल प्रशासनाने फोन बाबतची माहिती दिल्यानंतर कुलाबा पोलिसांनी कऱ्हाड पोलिसांना सांगितले. कऱ्हाड शहर पोलिसांनी ज्या मोबाइलवरून फोन आला त्या व्यक्तीची चौकशी केली असता तो मोबाइल हा त्याचा मुलगा वापरत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी मुलाकडे चौकशी केल्यावर त्याने गंमत म्हणून फोन केल्याचे सांगितले.

शूटआउट अ‍ॅट वडाळा, २६/११ यांसारख्या चित्रपटांचा प्रभाव माझ्यावर असल्याचे संबंधित मुलाने सांगितले. त्याचा समाजविघातक घटनांशी कुठलाही संबंध दिसून येत नाही. केवळ गंमत म्हणून त्याने हा कॉल केला होता.

– बी. आर. पाटील, कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

काय घडलं?

मुंबई येथील हॉटेल ताजच्या मागील दरवाजतून दोन अतिरेकी शिरत असल्याची माहिती रिस्पेशन काउंटरला मोबाईलवरून शनिवारी दुपारी देण्यात आली. यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने याबाबतची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याला कळविली त्यानंतर कुलबा पोलिसांनी संबंधीत घटनेची सविस्तर माहिती घेतील व सदरचा मोबाईल कोणाचा आहे व त्याचे लोकेशन काढले.

मोबाईलचे लोकेशेन कराड असल्यामुळे कुलबा पोलिसांनी याबाबत माहिती कराड शहर पोलीस ठाण्याला कळविली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी तातडीने संबंधीत मोबाईल कोण वापरत आहे याचा शोध घेतला. संंबंधीत मोबाईल हा ९वीमध्ये शिकत असलेला १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा ऑनलाईन शिक्षणासाठी वापरत होता. त्याच्या पालकांसमवेत मुलाची चौकशी केली असता अतिरक्यांवरील सिनेमे पाहून गंमत म्हणून फोन केल्याचे संंबंधीत मुलाने सांगितल्याचे प्रथम दर्शनी तपासात आढळल्याचे बी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज राज्यात ग्रामपंचायत मतदानाची रणधुमाळी!

News Desk

कॅगपासून माहिती लपवलेले ‘ते’ अधिकारी निलंबित, धनंजय मुंडेंची विधानसभेत घोषणा

News Desk

नारायण राणे दिल्लीला रवाना! नेमकं काय कारण?

News Desk