मुंबई। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच आरक्षण नाकारल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसींना त्यांच्या हाक्कांच राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी आज सकाळपासून भाजपकडून संपूर्ण राज्यभरात आज (२६जून) चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहेमुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.
आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पोलीस आले आणि सुरू असलेलं चक्का जाम आंदोलन थांबवलं. त्यावेळी पोलिसांनी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना अटक केली आहे. प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून याबाबतीत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारने अटक केली तरी देखील आमचा हा लढा सुरूचं राहील, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. तसेच जोवर ओबीसी समाजाचं सन्मानाचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नसल्याचंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलय, प्रविण दरेकर यांच्या व्यतिरीक्त आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येतं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.