HW News Marathi
देश / विदेश

“तुम्हाला फडणवीसांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करा” मिटकरींचा ‘या’ भाजप नेत्यावर घणाघात

मुंबई। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीये, या घटनेने आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. कारण सरनाईक यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केल होत. यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिकिया दिली होती.

प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला आहे. याबाबत प्रताप सरनाईकच नाही तर शिवसेनेचे ९०% आमदार, खासदार सरकारवर नाराज असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. बावनकुळेंना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बावनकुळे यांनी प्रताप सरनाईक आणि महाविकास आघाडी सरकारच्याबाबत बोलण्यापेक्षा विधानसभेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं . प्रताप सरनाईक यांचं लेटर अनेक अंगानी भाजपलाच डिवचणारं असुन भाजपच्या राजकीय दहशत वादाचं दर्शन घडवणारं आहे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मिटकरी यांनी ट्विट केलं आहे.

अमोल मिटकरींच्या टीकेला बावनकुळेंच प्रत्युत्तर

अमोल मिटकरींच्या या टीकेला बावनकुळेंनीही प्रत्युत्तर देताना मिटकरींवर निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षाने मला खूप काही दिले आहे. मी रेडिमेड आमदार नाही. मी कार्यकर्ता असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपतींच्या वंशजांनी भूमिका घ्यावी, असे बोललो तर त्यात चुकीचे काय?

News Desk

रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार दसऱ्यापूर्वी बोनस

News Desk

ही ममता बॅनर्जींची इमर्जन्सी आहे, आमची नाही !

News Desk