HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या नियमांचा फज्जा ! पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात चांगलीच गर्दी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन झाले. त्यावेळी ही गर्दी जमल्याचा प्रकार घडलाय दरम्यान, अजित पवार यांनी यापुढे कोणी गर्दी केली तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. मात्र, त्यांचा हा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नाही का, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. विरोधकांनी आघाडी सरकावर जोरदार टीका केली आहे. महत्वाचे नेते असे वागत असतील तर कोरोनाचे काय?, असा सवाल उपस्थित केला आहे.

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल असा अखेरचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. नागरिकांनी आता गांभीर्याने वागावे, असं अजित पवार यांनी म्हटले होते. अजित पवार यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. सोशल पवार स्वत: कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन करत आहेत. मात्र, त्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला.

“नो मास्क, नो उमेदवारी नाही”, यांनीही यापूर्वी असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात दिला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खबरदारी घेण्याचा इशारा दिला होता. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गांर्भीयाने घेताना दिसून येत नाही, हे पुण्यातील अजित पवार यांच्या कार्यक्रमात दिसून आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बीडमध्ये माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय?” – पंकजा मुंडे

Aprna

हिंमत आहे का दंगल करण्याची? इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊतांचा इशारा

News Desk

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk