HW News Marathi
महाराष्ट्र

‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आक्रमक!’

शिरूर। महाविकास आघाडी पक्षात जरी तीन पक्ष असले तरी देखील त्यांच्यात मतभेद सुरूच आहेत. खेड-जुन्नर या एकेकाळच्या सेनेच्या बालेकिल्ल्यात सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर शिरुर लोकसभेत कोल्हेंनी आढळरावांना खासदारकीचा चौकार मारु दिला नाही. शिवसेनेला हीच मोठी खंत आहे. कालपासून राऊत-मिर्लेकर आपल्या भाषणांत राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे देतायत. काल खेडमध्ये बोलताना राऊतांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना आव्हान दिलं तर आज उपनेते मिर्लेकरांनी शिरुरच्या आमदारांना इशारा दिलाय. डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना सज्जड दम दिला आहे.

हा एकेकाळचा शिवसेनेचा गड

शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा शिवसेनेचा गड… आढळराव पाटील यांनी तिथूनच खासदारकीची हॅट्रिक केली. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चौकार मारण्यापासून त्यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी रोखलं. तसंच विधानसभा निवडणुकीत देखील खेड, जुन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी धुसफूस आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांचा पुणे-शिरुर दौरा महत्त्वाचा आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेना नेते राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आक्रमक झाले आहेत तसंच राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे देत आहेत.

विनाकारण डिवचू नका

शिरूर मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हा वाद दिसून येतोय. काल आम्ही खेडच्या मोहिते पाटलांना आव्हानं देऊन आलोय. इथल्या शिरुरच्या आमदारांनाही सांगतोय विनाकारण डिवचू नका, वाघानं झेप घेतली तर सोडणार नाही, असा इशारा सेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी शिरुर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांना दिला आहे.

शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास- संजय राऊत

संजय राऊत यांनी काल जुन्नरमध्ये बोलताना उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलवलं तसंच शिवसेना नेत्यांच्या मनातली बात खुलेआम बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे आदेश देतानाच शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास वाटतो, असं राऊत म्हणाले. एकप्रकारे त्यांनी खा. कोल्हे आणि आमदार अतुलशेठ बेनके यांचा पराभूत करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण या चर्चा आमच्यासाठी गौण !

News Desk

‘साकीनाका बलात्कार प्रकरण- फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार’, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk

“अर्णब गोस्वामींच्या मुद्यावर भाजप गप्प का?” राऊतांचा सवाल

News Desk