HW News Marathi
Covid-19

आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राला सांगा !

मुंबई । पेट्रोल डिझेलवरील दरवाढीवरून महाविकासआघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री सध्या केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (७ जून) राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सुनावले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने राज्यातील कर कमी करून पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी आणि मग केंद्राकडे तशी मागणी करावी, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीला दिले आहे.

पेट्रोल डिझेलवरील राज्य सरकारचा कर कमी करून जनतेला दिलासा द्या !

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारचे धोरण आहे की, स्वतः काही करायचे नाही आणि प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारने केली पाहिजे. त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी होण्यासाठीही केंद्र सरकारनेच उपाय करावेत, अशी राज्यातील सत्ताधारी पक्षांची अपेक्षा आहे. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत आयातीचा दर, प्रक्रियेचा खर्च, वाहतूक खर्च आणि वितरकांचे कमिशन यामध्ये बदल होऊ शकत नाही. त्यावरील करांमध्ये फक्त बदल होऊ शकतो. अन्य राज्यांनी कर कमी केल्याने तेथे शंभरच्या आत दर आहे. महाविकास आघाडी सरकारनेही महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलवरील राज्य सरकारचा कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. या सरकारने स्वतः कर कमी करून मग केंद्राला आवाहन केले तर त्याला अर्थ आहे.

चंद्रकांत पाटील यावेळी पुढे म्हणाले की, कोरोना, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, अनुसूचित जाती – जमातींचे पदोन्नतीमधील आरक्षण अशा प्रत्येक बाबतीत उद्धव ठाकरे सरकारमध्ये गोंधळ असतो. तसाच प्रकार कोरोनाविषयी निर्बंधांबाबत होत आहे. या सरकारने सर्वांशी विचार विनिमय करून निश्चित दिशा ठरविण्याची गरज आहे.

संभाजीराजेंना पूर्ण ताकदीने पाठबळ देणार !

छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्षाची भूमिका स्वीकारली आहे. त्यांच्या भूमिकेला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असून मराठा समाजाचे प्रश्न सुटण्यासाठी पक्ष राजेंना पूर्ण ताकदीने पाठबळ देईल, याचा चंद्रकांत पाटील यांनी पुनरुच्चार केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता महाराष्ट्राच्या बदनामीच्या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण ? याची CBIने चौकशी करावी !

News Desk

लॉकडाऊनमध्ये राज्यात पोलिसांवर हल्ल्यांच्या तब्बल १५९ घटना

News Desk

३०० हून अधिक कोरोनाग्रस्त महिलांच्या प्रसुती, नायर रुग्णालयाने दिलेले योगदान अतुलनीय !

News Desk