HW News Marathi
महाराष्ट्र

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे पाटील यांचेकडे देण्यास मंजूरी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्राम विकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता लगेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याचे गृहमंत्रीपद सुपूर्द करण्यात आले आहे. अनिल देशमुखांनंतर गृहमंत्रीपदासाठी अनेक नवे पुढे येत होती. त्यापैकी दिलीप वळसे पाटील यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यामुळे, दिलीप वळसे पाटील हे कोणत्याही क्षणी राज्याचा गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारू शकतात.

सचिन वाझेंना अनिल देशमुखांनी महिन्याला बार-रेस्टॉरंट्सकडून १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याबाबत अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने CBI चौकशीचे आदेश र दिल्यानंतर तातडीने अनिल देशमुखांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून ते आता दिल्लीसाठी रवाना देखील झाले आहेत. तर दुसरीकडे, दिलीप वळसे पाटील हे कोणत्याही क्षणी राज्याचा गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारू शकतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५जणांचा मृत्यू तर ५ जखमी; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Aprna

‘कराड यांच्यापेक्षा माझी उंची खूप मोठी’, चंद्रकांत खैरेंची दानवे, कराडांवर शेलक्या शब्दात टीका!

News Desk

वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनाही त्यांच्या कर्माचे फळ पंतप्रधानांनी दाखवले !

News Desk