HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध, परीक्षा कशा घ्यायच्या, शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

मुंबई | महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवारी-रविवारी (१०-११ एप्रिल) लॉकडाऊन असणार आहे. तर रोज रात्री ८ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर १०वी-१२वीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही बैठक बोलवली आहे. या बैठकीत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे.

शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. उद्या (६ एप्रिल) ही बैठक होणार आहे. या बैठकीला शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित असतील. या बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा होणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाला आहे. त्यामुळे शनिवारी होणार्‍या पेपरचं काय होणार, त्याचे कशाप्रकारे आयोजन करायचं, यावरही चर्चा होणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार

नव्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मेला होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

पहिली ते आठवी सरसकट पास

च्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोव्हिडची परिस्थित लक्षात घेता महाराष्ट्रातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास केले जाणार आहे. तर नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास, लातूरवर पाणीटंचाईचे संकट

Gauri Tilekar

सत्तेची मस्ती अधिक काळ टिकत नाही हे पंतप्रधान मोदींनी विसरु नये -सुशीलकुमार शिंदे

News Desk

वानखेडेंकडून माझ्या जीवाला धोका, प्रभाकर साईल तक्रारीसाठी पोलीस आयुक्तालयात

News Desk