HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपालांकडून नुकतेच सन्मानित झालेले राजेंद्र सरग यांचे निधन

पुणे | जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवाशी आणि पुणे जिल्ह्यातील माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. राजेंद्र सरग यांना गेल्या रविवारी कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्यांना उच्च मधुमेह असल्याचे दिसून आले. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज पहाटे यांची प्राणज्योत मालवली. कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राजेंद्र सरग यांचा नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.

राजेंद्र सरग यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही श्री. सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्या परिवारापुरते चालणारे पक्ष आहेत !

News Desk

जाणून घ्या…निरा डाव्या कालव्याचा संघर्ष

News Desk

गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा | महेश तपासे

News Desk