HW News Marathi
Covid-19

मोठी घोषणा ! पुण्यात दिवसभर जमावबंदी, तर संध्या ६ ते सकाळी ६ संचारबंदी

पुणे । राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यातील मुख्य शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांची चिंताही वाढली आहे. पुण्यातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (२ एप्रिल) पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक झाली. यावेळी, पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नसले तरी निर्बंध कडक करणार येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर, थोड्याच वेळापूर्वी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पत्रकार परिषद झाली आहे. या पत्रकार परिषदेत देण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती अशी की, “पुण्यात दिवसभर जमावबंदी तर संध्याकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी लागू असेल. हे सर्व नियम उद्यापासून (३ एप्रिल) संपूर्ण जिल्ह्यात लागू होतील.”

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वपूर्ण मुद्दे :

* पुण्यात दिवसभर जमावबंदी, तर संध्याकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी

* सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट सात दिवस बंद, पार्सल सुविधा सुरु राहणार

* मॉल, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळ, सार्वजनिक बस वाहतूक सात दिवस पूर्ण बंद

* आठवडे बाजारही बंद

* लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकिय कार्यक्रम होणार नाहीत

* हे सर्व निर्णय उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू होणार

दिवसभर जमावबंदी

* पुण्यातील परिस्थिती बिकट, पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त

* वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक

* पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे १०० टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील

* पुण्यामध्ये इतर जिल्ह्यात रुग्ण उपचारासाठी येत आहे

त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येणार

* जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढवणार

* गेल्या १० दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण

* पुढील २ दिवसात ७५ ते ८० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट

* येत्या ३ ते ४ दिवसात १ लाख लसीकरणाचे लक्ष्य

* सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक

* ३० एप्रिलपर्यंत शाळा बंद राहणार

* १० वी आणि १२वीच्या परीक्षा होणार

* परीक्षेवेळी कोरोनाचे नियम पाळले जाणार

* सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनबाबात मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता – अस्लम शेख

News Desk

‘…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो’- मुख्यमंत्री

News Desk

सचिन पायलट अगदी बिनकामाचा माणूस, मी त्यांचा कट आधीच ओळखला होता !

News Desk