HW News Marathi
महाराष्ट्र

मला कोरोना ईडीची तारीख पाहून झाला नाही, खडसेंवर गिरीश महाजनांची बोचरी टीका

जळगाव | कोरोना हा कुणालाही, अगदी तरूण व पैलवानांनाही होतो. याचा विचार करता आपला कोरोना हा खराखुरा असून एकनाथ खडसे यांच्यासारखा ईडीचा कोरोना नसल्याचा पलटवार आज माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते. गिरीश महाजन यांना मध्यंतरी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर मुंबई येथील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर ते घरी परतले आहेत.

आज त्यांनी जळगावच्या जीएम फाऊंडेशन या आपल्या कार्यालयात येऊन आधीप्रमाणे कामकाज सुरू केली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना महाजन यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, सर्वत्र कोरोनाची रूग्णसंख्या वाढीस लागली असतांना जळगाव जिल्ह्यात स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. जिल्ह्यात बेडची कमतरता असून याचे व्यवस्थापन देखील बरोबर करण्यात आलेले नाही. तसेच अगदी दहा-दहा दिवसांपर्यंत कोरोनाचे रिपोर्ट मिळत नाहीत. अनेक ठिकाणी रेमडेसीवीर इंजेक्शन हे अतिशय चढ्या दराने विकले जात आहे. तर बर्‍याच खासगी रूग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात येत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर्स व अन्य कर्मचार्‍यांची संख्या देखील पुरेशी नसल्याचे ते म्हणाले.

तसेच कर्मचार्‍यांचे मानधन देखील थकलेले असून नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असल्याचा आरोप आ. महाजन यांनी केला. याप्रसंगी आमदार गिरीश महाजन यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठींबा व्यक्त करून राज्य सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याचा आरोप केला. याप्रसंगी एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या सारख्या युवा नेत्याला कोरोना कसा झाला ? या वक्तव्याची आठवण करून दिली.

यावर आमदार महाजन म्हणाले की, माझा कोरोना हा खराखुरा असून ईडीचा कोरोना नाही. कोरोना हा सर्वांनाच, अगदी तरूण व पैलवानांनाही होतो. माझ्यासह माझ्या कुटुंबाला कोरोना झाला होता. आम्ही सर्व जण दहा दिवस सरकारी रूग्णालयात अ‍ॅडमीट झालो होतो. मात्र माझा कोरोना हा ईडीची तारीख आली म्हणून झालेला कोरोना नाही. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना ईडीची तारीख आल्यावर कोरोना होतो. व ते नंतर बाहेर फिरत असतात अशा शब्दांमध्ये आ. गिरीश महाजन यांनी एकनाथ खजसेंवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा”, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर

News Desk

हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत, फडणवीसांचा खरमरीत टोला

News Desk

अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा  लवकर उपलब्ध कराव्या! – देवेंद्र फडणवीस

Aprna