HW News Marathi
देश / विदेश

अहमदाबादेत शरद पवार अन् अमित शहांची गुप्तभेट ? राष्ट्रवादीकडून आली ही प्रतिक्रिया

मुंबई । राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा बदलांचे वारे वाहू लागण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचे कारणही तसेच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर शुक्रवारी म्हणजेच २६ मार्चला ही भेट झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर खरंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेले असताना राष्ट्रवादीकडून मात्र हे वृत्त फेटाळण्यात आले आहे.

अहमदाबादमधून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते थेट मुंबईला आले. ते तिथे कोणालाही भेटले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, “शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाल्याची बातमी म्हणजे केवळ अफवा असून हे भाजपचे षडयंत्र आहे”, असा आरोप करत राष्ट्रवादी नेते, प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हे वृत्त पूर्णपणे फेटाळले आहे. त्यामुळे नेमके खरे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्याचे राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या गेल्या काही दिवसांमध्ये घडणाऱ्या धक्कादायक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत होते. मात्र, राष्ट्रवादीकडून हे वृत्त आता फेटाळण्यात आले आहे. प्रफुल पटेल यांनी भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याचेही बोलले जात होते. दरम्यान, ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने या गुप्त चर्चेबाबतचे वृत्त दिले होते. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर, या तिघांची भेट झाल्याचा दावाही या वृत्तपत्राकडून करण्यात आला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकात राजकीय भूकंप : आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेस-जेडीएसचे सरकार धोक्यात ?

News Desk

काँग्रेसचा हात सपाची सायकल चालवू  शकणार नाही 

News Desk

‘आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री सगळेच टेन्शनमध्ये’, नितीन गडकरींची टोलेबाजी

News Desk