HW News Marathi
Covid-19

चिंतेत मोठी भर ! राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आज ३१ हजारांच्या पार

मुंबई | सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा राज्याची चिंता वाढवत आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० शहरांपैकी ९ शहरे ही एकट्या महाराष्ट्रात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर नुकत्याच जारी झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आज (२४ मार्च) तब्बल ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर त्यापैकी तब्बल५ हजार १८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद एकट्या मुंबई शहरात झाली आहे. अत्यंत वेगाने वाढणारा हा आकडा लक्षात घेता आता शासन-प्रशासन नेमकी काय कठोर पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राज्यातील कोरोनास्थितीबाबत आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ९५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाबा म्हणजे याच एका दिवसात राज्यात १५ हजार ०९८ जण कोरोनमुक्त झाले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर पुणे, त्यानंतर नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अकोला या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे, कठोर निर्बंध हाच पर्याय राज्य सरकारपुढे असल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा आमदार फुटला अन् एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटू नये !

News Desk

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती

News Desk

आता ‘ब्रेक द चेन’ ! कोरोनाला थोपविण्यासाठी ठाकरे सरकारचे कडक निर्बंध

News Desk