HW News Marathi
देश / विदेश

परमबीरसिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या E-Mailबाबत शहानिशा होणार

मुंबई | गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी ४ वाजून ३७ मिनिटांनी पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

“वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे. त्यामुळे शनिवारी (२० मार्च) प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे”, असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही परमबीर सिंग यांच्या आरोपांची शहानिशा करण्यात यावी अशी मागणी केली होती. तसे प्रसिद्धी पत्रकच अनिल देशमुख यांनी जारी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिमानास्पद ! विदर्भाचा माणुस थेट स्कॅाटिश संसदेत झाला खासदार

News Desk

संजय राऊत आज दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना भेटणार

News Desk

शिवसेनेचा पश्चिम बंगाल निवडणूक न लढवण्याचा निर्णय – संजय राऊत

News Desk