नवी दिल्ली | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल भाजपमध्ये प्रवेश केला आहे.अयोध्येतील राम मंदिरामुळे देशभरात भाजपचं मोठं कौतुक केलं जात आहे, दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर हे ‘राम’ भाजपला पावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Actor Arun Govil, best known for playing lord Ram in Ramayan TV series, joins Bharatiya Janata Party (BJP) in Delhi. pic.twitter.com/ddEfyQGFS2
— ANI (@ANI) March 18, 2021
अरुण गोविल यांच्याविषयी थोडक्यात माहिती
अरुण गोविल यांनी रामायण व्यतिरिक्त अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘विक्रम और बेताल’, ‘लव कुश’, ‘बुद्ध’ अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. त्याचबरोबर ‘पहेली’, ‘सावन’ सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे. लोकांनी मालिकेतील कलाकारांना डोक्यावर घेतलं होतं. या मालिकेतील कलाकारांप्रती लोकांच्या मनात एक वेगळा आदर आहे. या मालिकेत सीताची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी याआधीच भाजपात प्रवेश केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.