HW News Marathi
महाराष्ट्र

परमवीर सिंग यांना तात्काळ निलंबित करण्याची शिफारस करा !

मुंबई | परमवीर सिंग यांची पोलीस आयुक्त पदावरून बदली हे केवळ मखलाशी असून मुंबई पोलीस आयुक्तालयातूनच दहशतवादी खंडणी व खुनासारखे गुन्हे घडत असताना सुद्धा पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना त्याची माहिती नसावी असे म्हणणे केवळ हास्यास्पद आहे. सचिन वझे प्रकरणात ज्या प्रकारे मुख्यमंत्री उघडे पडले. त्याचप्रकारे परमवीर सिंग यांच्या प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्री उघडे पडतील. त्यामुळे परमवीर सिंग यांना आणखी पाठीशी न घालता त्यांना निलंबित करण्याची केंद्राकडे तात्काळ शिफारस करावी, अशी आग्रही मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज (१७ मार्च) केली आहे.

“मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन असलेली कार ठेऊन त्यांना धमकविल्या प्रकरणी सचिन वझे याला NIA ने अटक करून आज तीन दिवस उलटून गेले असताना व यात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत असताना सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही गप्प आहेत. मुळात ख्वाजा युनूसच्या खुनाच्या आरोपाखाली 2004 साली निलंबित झालेल्या सचिन वझे या पोलीस उपनिरीक्षकाला 16 वर्षांनी का सेवेत घेण्यात आले? केवळ सेवेत घेऊन शांत न बसता त्याला गुन्हे अन्वेषण विभागात रुजू का केले? एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्या ठिकाणी जबाबदारी देण्याची आवश्यकता असताना सुद्धा एका पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला ती जबाबदारी का दिली?”, असा सवालही यावेळी भातखळकर यांनी केला आहे

प्रश्नांची सरबत्ती सुरू ठेवत पुढे अतुल भातखळकर म्हणतात,

“सचिन वझे याच्या विरोधात पुरावे मिळून सुद्धा मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग दोन-दोन तास सचिन वझे याच्याशी काय चर्चा करत होते? मनसुख हिरेण यांच्या खुनाच्या गुन्ह्यात सखोल चौकशी का केली जात नाही? अगोदर सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या परमवीर सिंग यांना सचिन वझे प्रकरणात सुद्धा सूट का देण्यात आली? सचिन वझे यांचे धागेदोरे मुंबईच्या पोलीस आयुक्तालयापर्यंत पोहोचलेले असताना सुद्धा परमवीर सिंग यांना निलंबित करण्याची कार्यवाही का केली जात नाही? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे देण्याची आवश्यकता असताना सुद्धा मुख्यमंत्री एक शब्द बोलायला तयार नाहीत. त्यामुळे नक्की मुख्यमंत्री अजूनही कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत?”, असा सवालसुद्धा अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ST महामंडळाच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव झालेला नाही!”

News Desk

महाड दुर्घटना : NDRFच्या जवानांनी ६ वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढले

News Desk

हे तीन पाटाचं सरकार आहे, बदल्यांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू – देवेंद्र फडणवीस

News Desk