HW News Marathi
महाराष्ट्र

नोटीस पाठवली तर शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू ! राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा 

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना NIAकडून १० दिवसांसाठी कोठडी सुनावण्यात आल्याने एकीकडे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनी याच पार्श्वभूमीवर सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध सांगत वरुण सरदेसाई यांच्यावरही गंभीर आरोप केले. नितेश राणेंच्या या आरोपानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले. सरदेसाईंच्या प्रत्युत्तरावर आता पुन्हा नितेश राणेंनी पलटवार केला आहे. “वरुण सरदेसाईंनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू”, असा थेट इशारा नितेश राणे यांनी आता दिला आहे.

नितेश राणे यावेळी बोलताना म्हणले कि, “आम्ही ३९ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्ही देखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही.” पुढे नितेश राणे म्हणाले कि, “आम्ही सचिन वाझेंशी असलेले वरुण सरदेसाईंचे संबंध समोर आणल्यानंतर वरुण सरदेसाईंनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू”, असा इशारा नितेश राणेयांनी दिला.

नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत वरुण देसाईंवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी वरुण सरदेसाई यांनी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेत अनिल परब यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत वरुण सरदेसाईंनी, “आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन”, असा इशारा नितेश राणेंना दिला. त्यावर नितेश राणेंनी शिवसेनेची अंडीपिल्ली बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे – उदयनराजे भोसले

News Desk

‘४५ हजार कृषी विद्यार्थ्यांना दिलासा,’ दादा भुसेंची महत्वाची माहिती!

News Desk

विरोधी पक्षांतील नेत्यांनाही वाटते, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत !

News Desk