मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली काहीच दिवसांपूर्वी सापडली होती. त्यानंतर, त्या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा अत्यंत धक्कादायक पद्धतीने मृत्यू झाला आणि खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणी आता NIA कडून एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे आधीच ठाकरे सरकारची पुरती कोंडी झालेली असताना आता या प्रकरणावर अभिनेत्री कंगना राणावत हिने एक ट्विट करत ठाकरे सरकारला इशारा आहे. या ट्विटमध्ये कंगनाने असा दावा केला आहे कि, “या प्रकरणातील सत्य बाहेर आले तर ठाकरे सरकार पडेल.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1370965964381159425?s=20
एनआयए या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत वाझे यांना अटक करण्यात आली आहे.
NIA arrests Mumbai police officer Sachin Vaze in connection with its investigation into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani's house in Mumbai https://t.co/6AZvHH6rz2
— ANI (@ANI) March 13, 2021
कंगना राणावत आपल्या ट्विटमध्ये म्हणते कि, “या निलंबित पोलिस अधिकाऱ्याला शिवसेना सत्तेत आल्यानंतर पुन्हा सेवेत रुजू झाला आहे. मात्र, याप्रकरणी जर योग्य ती संपूर्ण चौकशी केली तर फक्त अनेक मोठे खुलासेच होणारे नाहीत तर महाराष्ट्र सरकारही पडेल”, असा दावा कंगना राणावत हिने केला आहे. दरम्यान, दुसरीकडे राज्यातील मुख्य विरोधी पक्ष भाजपही या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आक्रमक असल्याने महाविकासआघाडीसाठी निश्चितच हा आव्हानात्मक काळ आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आता या प्रकरणी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा यासंदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे. “संबंधित प्रकरणाच्या चौकशीत जे काही सत्य बाहेर येईल, जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल”, असे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, महाराष्ट्र भाजप या प्रकरणी आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधून अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे “गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हकालपट्टी करावी”, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. तर दुसरीकडे सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.