HW News Marathi
Covid-19

निलेश लंकेंचा थेट कोविड सेंटरमध्ये मुक्काम! रुग्णसेवेचा अहोरात्र सपाटा सुरुच

पारनेर | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले आहेत. गेल्यावर्षीच्या कोरोना काळातही त्यांनी लोकांसाठी कोविड सेंटर उभारले होते. यावर्षी हा वाढती कोरोना संख्या लक्षात घेत निलेश लंके एक्शन मोडमध्ये आले आहेत. दरम्यान,पारनेरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेसाठी इथेच मुक्काम करत आहेत.

कोरोना झालेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं काम निलेश लंके दिवसरात्र करताना दिसत आहेत. निलेश लंके यांनी गेल्यावर्षी कर्जुले हर्या येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर उभारून साडे चार हजार कोरोना बाधित रुग्णांना मदतीचा हात दिला होता. त्यानंतर यंदाच्या कोरोना लाटेतही निलेश लंके यांनी भाळवणी येथे अकराशे बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निलेश लंके यांच्या कामांची दखल घेत लोकांचे काळजी घेताना स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले होते.

निलेश लंके कोविड सेंटरच्या माध्यमातून जनसेवा करत असून या ठिकाणी ते जेवण करतात हे तर समोर आलंचं होते. पण आता निलेश लंकेंनी चक्क या कोविड सेंटरमध्ये मुक्कामदेखील केला आहे. रात्री बेरात्री एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागली किंवा अन्य औषधांची गरज भासली तर ते इथेच उपलब्ध राहून तात्काळ रुग्णाला मदत करतात. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात ते कोविड सेंटरमध्येच जमिनीवर झोपलेल्याचं दिसून येत आहे. आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसत आहेत.

या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, शिरा, पोहे तर दुपारच्या जेवणामध्ये मांसाहार, पालेभाज्या तसेच यांच्यासह फळे ते पाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी देण्यात येतं. जिल्हाभरातून हजारो रुग्ण सेंटरमध्ये दाखल झाले असून दररोज शंभराच्यावर पेशंट बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे शरदचंद्र पवार महाकोविड सेंटर गोरगरीब रुग्णासाठी आधार केंद्र आहे.

माझं काय व्हायचं ते होऊ द्या… – निलेश लंके

“आपलं काय व्हायचं ते होऊ द्या. जर मी घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. माझी लोकं सुरक्षित असली पाहिजेत,”असं म्हणत लंके हे दिवसरात्र कोरोनाबाधितांच्या सेवेत झटत आहेत. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून तो त्यांचा कुटुंबप्रमुखही असतो, अशी भावना लंके यांनी व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

ओमायक्रॉनवर मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता; लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk

चिंताजनक! देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

News Desk