HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र एकीकरण समिताच्या शुभम शेळकेंच्या मतपेटीत १ लाखांपेक्षा जास्त मतांची पडली भर 

बेळगाव | अत्यंत चुरशीच्या झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगल अंगडी यांनी कांग्रेसच्या सतीश जरकीहोळी यांचा अवघ्या ५ हजार २४० मतांनी पराभव केला. दरम्यान, या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार यांनीही जोरदार लढत दिली होती. भाजपा आणि काँग्रेसमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईत शुभम शेळके तिसऱ्या स्थानी राहिले होते. मात्र शेळकेंनाही मतदारांनी भरभरून मदतान करताना तब्बल १ लाख १७ हजार १७४ मतांचे दान त्यांच्या पदरात टाकले.

लोकसभा पोटनिवडणूकित महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा उमेदवार शुभम शेळके यांनी १ लाख १७ हजार मते मिळवत नवीन इतिहास रचला आहे. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या उत्तर दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. शेळके यांनी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण बेळगाव मध्ये ४४ हजाक ९५० बेळगाव उत्तर मध्ये २४ हजार ५९४ तर बेळगाव ग्रामीण मधून ४५ हजार ५३६ मते मिळवत दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा घाम काढला आहे.

भाजप आणि काँग्रेसमध्ये रंगलेल्या या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारामुळे रंगत आणली होती. त्यात शिवसेनेने शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर केल्याने एकीकरण समितीच्या उमेदवाराचे बळ अधिकच वाढले होते. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शुभम शेळकेंचा प्रचार केला होता. तसेच, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरही प्रचारासाठी गेल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीस आपल्या गाण्याच्या माध्यमातून येणार पुन्हा भेटीला!

News Desk

महविकासआघाडीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही !

News Desk

पंढरपूर पोटनिवडणूक बिनविरोध करायचं भाजपने ठरवलेलं, पण… – रणजितसिंह निंबाळकर

News Desk