HW News Marathi
महाराष्ट्र

“श्रीराम बोले मै कहाँ बडा, मै तो बीजेपी के मॅनिफेस्टो मे पडा”, सत्यजित तांबेंनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई | राम मंदीर उभारणीसाठी निधी जमवण्यावरून सध्या राजकीय पक्षांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनीही एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपवर शरसंधान साधलं आहे. दरम्यान, त्यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये एक भाजपविरोधी नेता भाजपच्या ठायी श्रीराम काय आहेत ते सांगत आहे.संबंधित व्हिडिओमध्ये संबंधित नेता देव-देवतांची एक गोष्ट सांगतो. त्यानुसार सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ कोण? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व देव करत असतात आणि ते सर्वजण आधी गंगा नदीच्या तिरी जातात त्यानंतर ते शंकराकडे जातात आणि नंतर ते पर्वताकडे जातात.

पर्वताकडुन ते सर्व बजरंगबली हनुमानाकडे जातात आणि सर्वात शेवटी अखेर ते सर्वजण श्रीरामाकडे येतात. श्रीरामाकडे आल्यानंतर ते स्वत: सर्वांना सांगतात मी तर भाजपच्या जाहीरनाम्यातच असतो. त्यामुळे मी कसा मोठा? जेव्हा निवडणूक आली तेव्हा फक्त मला बाहेर काढलं जातं आणि निवडणूक संपली की पुन्हा आपल्या जागेवर. अशाप्रकारे या व्हिडिओमध्ये तो नेता भाजपवर टीका करताना दिसुन येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यापुर्वी भाजपच्या निधी संकलनावरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओने नविन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

7 एप्रिलनंतर शिवसेनेकडून मंत्रिमंडळात फेरबदल ?

News Desk

‘बेळगाव महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला!’

News Desk

राज्यात ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या ३१ वर, तर देशात रुग्णांचा आकडा १०० पार

swarit