HW News Marathi
Covid-19

शरद पवारांकडून पुण्यासाठी ८ सुसज्ज कार्डिओ ॲम्ब्युलन्सची घोषणा

पुणे | पुण्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज (४ सप्टेंबर) पुण्याच्या आढावा दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवारांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून पक्षाकडून शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांत हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पवारांच्या या दौऱ्यादरम्यान करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी एक अशा एकूण ८ सुसज्ज कार्डिओ ॲम्ब्युलन्स पुणे शहरासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शरद पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांसोबतच राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौरांसोबत देखील चर्चा केली आहे.

येत्या सोमवारपासूनच (७ सप्टेंबर) या हेल्पलाइनच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना पवारांनी यावेळी दिल्या आहेत. तर पुढच्या आढवड्यात ६ आणि त्यानंतर आणखी २ कार्डिओ ॲम्ब्युलन्स पुणे शहरासाठी सज्ज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे उद्योग क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी या ॲम्ब्युलन्स देण्याची तयारी दाखवली आहे.

शरद पवार यांनी आपल्या पुण्यातील आढावा बैठकीत प्रामुख्याने कोरोना प्रतिबंध उपाययोजनांवर अधिक भर दिला आहे. पुण्यातील कोविड सेंटरबाबतच्या तक्रारी आणि त्रुटींबाबत देखील पवारांनी यावेळी माहिती घेतली.दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे, पवार उद्या (५ सप्टेंबर) संपूर्ण दिवस पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, कोरोनापासून वाचायचे असल्यास मास्क बंधनकारक

News Desk

कोरोना उपचारासाठी रुग्णालयाच्या मनमानी बिलांना चाप लावण्यासाठी सरकारचा ‘हा’ निर्णय

News Desk

देशातील वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी तत्परतेने कृतिशील होण्यावर उपराष्ट्रपतींनी दिला भर

Aprna