HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणात पत्रकार परिषदेतून अमिताभ गुप्तांनी हसत काढता पाय घेतला

पुणे | बीडची तरुणी पूजा चव्हाणचा ७ फेब्रुवारीला पुण्यात मृत्यू झाला, मात्र याबाबत पुणे पोलिसांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पूजा चव्हाण प्रकरणात पत्रकार परिषद सुरु असताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मात्र हसून थेट पत्रकार परिषदेतूनच काढता पाय घेतला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाल आहेत. पूजा चव्हाणच्या शवविच्छेदन अहवालात काय आलं आहे? पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा कधी दाखल होणार आहे? तपास कुठवर आला? असे विविध प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले होते. मात्र यावर पोलीस आयुक्तांनी फक्त हसून चालू पत्रकार परिषदेतून पळ काढला.

पुणे पोलिसांवर कुठला दबाव आहे का?

पोलिसांची अळीमिळी गुपचिळी का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.आत्महत्येचे प्रकरण, गुन्हा मानूनच तपास सुरुपूजा चव्हाण मृत्यू प्रकरण हे आत्महत्येचे आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करतात, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले आहे. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांवर राजकीय दबाव आहे का?

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी असे कोणतेही भाष्य करणार नाही, ज्याच्यावरुन तुम्ही नवे अंदाज बांधाल, असे नगराळे यांनी म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीनगर नव्हे ‘छत्रपती संभाजीनगर’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणास शिंदेंची मान्यता

Manasi Devkar

नांदेडमध्ये वंचित घटकांची मतदार नाव नोंदणीला सुरूवात

News Desk

जिल्हा परिषदेच्या निवडणुका! ओबीसी विरुद्ध ओबीसी असा लढा रंगणार

News Desk