HW News Marathi
महाराष्ट्र

“मी शरद पवारांच्या तालमीत तयार झाले हे सांगायला मला संकोच वाटत नाही – चित्रा वाघ

पुणे | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पूजाचा मृत्यू झाला, त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाघ ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार बरसल्या. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संजय राठोड यांना पाठीशी घालणार नाहीत, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.“

मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास आहे.” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

संजय राठोड २३ फेब्रुवारीला वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते. त्यावेळी समर्थकांनी पोहरादेवीवर मोठी गर्दी केली होती. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नियम पाळा असे आवाहन केले होते. तर दुसरीकडे शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आलीय, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका!

News Desk

प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराचा विष पाजून खून 

News Desk

राणा दाम्पत्य एक दिवस आधीच मुंबईत दाखल, ‘मातोश्री’ बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Aprna