HW News Marathi
महाराष्ट्र

बेळगाव पोटनिवडणुकीत शुभम शेळकेच्या प्रचारासाठी राऊतांपाठोपाठ रुपाली चाकणकरही मैदानात!

बेळगाव | देशात राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी निवडणूकांची रणधुमाळीही सुरु झाली आहे. महाराष्ट्रात पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीची एकीकडे तयारी सुरु असताना दुसरीकडे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदार संघात पोटनिवडणूक आहे. १७ एप्रिलला ही निवडणूक होणार आहे.

याच निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना खासदार संजय राऊत सध्या बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी ते बेळगावात गेले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरही बेळगावात पोहोचल्या आहेत.पंढरपूर येथे भगीरथ भालके यांचा प्रचार केल्यानंतर बेळगावात शिवसेनेच्या साथीला राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता बेळगावातही सेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पाठिंब्याने शुभम शेळके विजयी होणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

संजय राऊतांनी बेळगावात भव्य रोड शो !

दरम्यान, संजय राऊत बेळगावमध्ये जाण्याआधी प्रशासनाने त्यांचा भाषणाचा स्टेज तोडल्याची घटना समोर आली. मात्र, तरीही भाषण करणारचं असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. बेळगावात संध्याकाळी संजय राऊत यांचा रोड शो निघाला होता. यावेळी कानडी प्रशासनाने वीज घालवली होती. मात्र, या रोड शोमध्ये सामील झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी टॉच लावत रॅली सुरु ठेवली. यावेळी त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली होती.

शुभम शेळकेंना शिवसेनेचा पाठिंबा !

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचं मतदान होणार आहे. तत्पूर्वी बेळगावात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून माघार घेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजपा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात ही मोठी लढत होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले सातारा वैद्यकीय महाविद्यालय वर्षभरात सुरु होण्याचा मार्ग मोकळा

News Desk

रत्नागिरी अन् वाशीममध्ये २ जण कोरोना पॉझिटिव्ही, दिल्लीच्या मरकजमध्ये होते सहभागी

swarit

नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: बाळासाहेब थोरात

News Desk