HW News Marathi
देश / विदेश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली आहे. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाकडून प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली आहे.

एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. याआधी प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली होती.“प्रणव मुखर्जी यांच्यामध्ये फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसत असून प्रकृती बिघडली आहे. ते अद्यापही व्हेंटिलेटरवर असून तज्ञांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे,” अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकेकाळी ज्यांना पोलिस व्हायचे होते त्यांनी राजकारणाची वाट धरली!

News Desk

माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही !

News Desk

योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पत्रकार प्रशांत कनोजियांच्या तात्काळ सुटकेचे आदेश

News Desk