मुंबई | महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत वाढत होते आणि कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील धारावीने आता जगासमोर कोरोना मुक्तीचा पॅटर्न ठेवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावीत राबवलेल्या उपाययोजनांचे जगभरातून कौतुक केले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी धारावी मॉडेलची तोंडभरून स्तुती केली आहे. यानंतर आता फिलिपीन्स सरकारनं धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेशी संपर्क साधला आहे.
धारावीप्रमाणेच फिलिपीन्समध्येही लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे फिलिपीन्स सरकार धारावी पॅटर्न राबवण्याच्या प्रयत्नात आहे. फिलिपीन्स सरकारनं यासाठी संपर्क साधल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. ‘आम्ही चेस द व्हायरस मोहीम राबवली. विषाणूचा पाठलाग करून त्याला लवकरात लवकर संपवण्याच्या दृष्टीनं ही मोहीम राबवण्यात आली. फिलिपीन्स सरकारलादेखील ही मोहीम राबवायची आहे. त्यामुळे आम्ही त्यांना योजनेचा आराखडा दिला आहे,’ असं चहल यांनी सांगितलं.
धारावीप्रमाणेच फिलिपीन्समध्येही लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे फिलिपीन्स सरकार धारावी पॅटर्न राबवण्याच्या प्रयत्नात आहे. फिलिपीन्स सरकारनं यासाठी संपर्क साधल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. ‘आम्ही चेस द व्हायरस मोहीम राबवली. विषाणूचा पाठलाग करून त्याला लवकरात लवकर संपवण्याच्या दृष्टीनं ही मोहीम राबवण्यात आली. फिलिपीन्स सरकारलादेखील ही मोहीम राबवायची आहे. त्यामुळे आम्ही त्यांना योजनेचा आराखडा दिला आहे,’ असे चहल यांनी सांगितलेे.
फिलिपीन्समधील वृत्तसंकेतस्थळ इनक्वायररनं दिलेल्या वृत्तानुसार, फिलिपीन्सच्या आरोग्य मंत्रालयानं धारावी मॉडेल उत्तम असल्याचं म्हटलं आहे. फिलिपिन्समधील लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे धारावी मॉडेल प्रभावी ठरेल, असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे. धारावीत २.५ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात १० लाख लोक राहतात. म्हणजेच प्रति ९ वर्ग मीटरमध्ये ८ ते १० जण राहतात. अशीच काहीशी परिस्थितीत फिलिपीन्समध्ये आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.