HW News Marathi
Covid-19

पंढरपूरचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण

पंढरपूर | लोकनेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची बाधा झाली, तेव्हापासून त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण अस्वस्थ आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी कोणी देवाला नवस केले आहेत तर कोणी व्रत उपासना सुरु केले आहेत. अनेकांच्या मनात देवाच्या जागी सुधाकरपंत परिचारक यांना स्थान आहे. सुधाकरपंत परिचारक यांचे नातू आणि प्रशांत परिचारक यांचे पुत्र प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवर ही भावनिक पोस्ट केली आहे.

“गेल्या पन्नास वर्षापासून ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता, ते ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे” असे आवाहन नातू प्रितीश प्रशांत परिचारक यांनी केले आहे. ८५ वर्षीय सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

सुधाकरपंत परिचारक यांनी २०१९ मध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

काय आहे पोस्ट?

“गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करत असताना परिचारक कुटुंबातील अनेक जणांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. सर्व जण त्यांच्या लक्षणांनुसार योग्य ते उपचार घेत आहेत. सर्व जण डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून व गरज भासल्यास COVID विलगीकरण वॉर्डमध्ये यशस्वी उपचार घेत आहेत.

आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या मोठ्या मालकांवर (सुधाकरपंत परिचारक) पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यामुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे. गेली 50 वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इच्छाशक्तीवर आणि आपल्या प्रार्थनेच्या बळावर ते ही लढाईही जिंकतील अशी आशा करुयात. वकील साहेब, प्रशांत मालक, उमेश काका, प्रणव दादा व इतर सर्व परिचारक कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे.” अशी माहिती प्रितीश यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद

News Desk

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा!

News Desk

श्रमिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत आपापल्या राज्यांत पोहोचवले जात आहे

News Desk