HW News Marathi
महाराष्ट्र

जळगाव महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देणार?

जळगाव | राजकारणात सध्या सत्ताधारी पक्षाने विरोधकांना आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निवडणूकीत धक्का देण्याचे प्रयतन सुरुच आङेत. गेल्या काही निवडणूकांमध्ये महाविकासआघाडी सरकारने भाजपला जोरदार धक्का दिल्याचं पाहायला मिळालं. जळगाव महापालिकेतही सत्तांतर करून भाजप नेते गिरीश महाजन यांना धक्का देण्यात आला होता. आता जळगाव जिल्हा परिषदेतही सत्तांतराची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सुरू केली आहे. त्यांनी यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या गटनेत्यांशी चर्चाही केली आहे. त्यामुळे लवकरच महाजनांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. या निवडणूकीला अजून निवडणुकीला १ वर्ष बाकी आहे. अशा स्थितीत भाजपची सत्ता घालवण्याची तयारी सुरू झाली आहे. जळगाव येथे खडसेंच्या मुक्ताई निवासस्थानी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पाटील, माजी आमदार गुरुमुख जगवांनी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना रवींद्र पाटील यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेतील सत्तांतर करण्याबाबत चर्चा झाली. तसेच, जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या जागेत व्यापारी संकुल उभारून झालेल्या दोनशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचाही चर्चा करण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शरद पवार राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत हे तपासण्याची वेळ आलीये”, नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य

News Desk

#Gopinathgadh : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्ताने मेळावा, पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष

News Desk

रत्नागिरीत शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, हाती बांधणार घड्याळ?

News Desk