HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत म्हणतात…

मुंबई | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पण संजय राऊत यांनी थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील असं राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांची पूजा चव्हाण प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असं त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर राऊत हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्यपाल महाराष्ट्राची मोठी समस्या’; शिवसेनेची टीका

News Desk

शरद पवारांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

“शरद पवारांबाबतची अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही”, लंकेंनी घेतला पडळकरांचा समाचार

News Desk