HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांचे विधान कधीही निरर्थक नसते, मिडियाने यात दखल देऊ नये ! 

मुंबई | “शरद पवारांना जे ओळखतात त्यांनी समजून घेतले पाहिजे कि पवारांचे कोणतेही वक्तव्य हे कधीच निरर्थक नसते. त्यामुळे शरद पवारांचा अनुभव आणि त्यांचे देशाच्या राजकारणातील स्थान पाहता प्रसारमाध्यमांनी या वादात न पडलेले बरं. पवारांच्या भूमिकेची, व्यक्तव्याची मीडियाने फार चिंता करू नये”, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी चक्क पत्रकारांना या प्रकरणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांना फटकारले. याविषयी संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे आज (१३ ऑगस्ट) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

‘शरद पवारांच्या पार्थ पवारांविषयीच्या वक्तव्यामुळे पुन्हा महाविकासआघाडीत ताटातूट दिसणार का ?’ या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली, वक्तव्य केले असेल तर त्यावर मीडियाने फार चिंता करण्याचे कारण नाही. पवार साहेबांना ओळखणे कठीण. पण जे पवारांना ओळखतात त्यांनी समजून घेतले पाहिजे कि पवारांचे कोणतेही विधान हे निरर्थक नसते. त्यांचा अनुभव, ज्येष्ठता, देशाच्या राजकारणातील त्यांचे स्थान पाहता प्रसारमाध्यमांनी आणि पत्रकारांनी या वादात न पडलेले बरे”, असे म्हणत संजय राऊत यांनी पत्रकारांना चक्क या विषयात दखल न देण्याचा सल्ला दिला आहे.

शरद पवारांचे नेमके विधान काय ?

शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारताना असे म्हटले कि, “पार्थ पवार इममॅच्युर. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही.” दरम्यान, पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांत राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवारांविरोधात आणि विसंगत अशी भूमिका घेताना दिसून आले. राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यानंतर काल (१२ ऑगस्ट) खुद्द शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंगांनी गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपचा तपास आता CBI करणार

News Desk

वाझे प्रकरणात शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी होऊ द्या, NIA तर आलीच आता CIA किंवा KGF ला बोलवा!

News Desk

विकासकामे करून दाखवणारे सरकार! – उद्धव ठाकरे

Aprna