HW News Marathi
महाराष्ट्र

पार्थ प्रकरणानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला..

मुंबई । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये अनेक खलबत सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार नाराज आहेत का अशी चर्चा सुरु आहे कारण त्यांनी पार्थ पवार प्रकरणावर काहीच प्रतिक्रियाअद्याप दिलेली नाही. आज १० मिनिटं अजित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे मंत्रालयातून बाहेर पडल्या. मतदारसंघातील कामासाठी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली होती. पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत आणि त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर अजित पवार आणि पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीकडूनही अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पार्थ पवार यांनाही आजोबांनी केलेल्या या वक्तव्यावर विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण टाळलं आहे.

शरद पवारांचे नेमके विधान काय ?

शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारताना असे म्हटले कि, “पार्थ पवार इममॅच्युर. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही.” दरम्यान, पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांत राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवारांविरोधात आणि विसंगत अशी भूमिका घेताना दिसून आले. राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यानंतर काल (१२ ऑगस्ट) खुद्द शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार नाराज नसल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येही अजित पवार मधूनच गेले, पण त्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती. तसंच मंत्रिमंडळ बैठक लांबली आणि अजित पवारांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते गेल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलढाणा : शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्यास अटक, उकीरड्यात पुरलेले 42 लाख जप्त

Manasi Devkar

MPSCच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र द्या अन्यथा…पडळकरांचा सरकारला इशारा

News Desk

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक

News Desk