HW News Marathi
महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या ‘ त्या ‘ वादग्रस्त वक्तव्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यासंबंधी आज सुनावणी

संगमनेर | कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे. संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज (७ ऑगस्ट) इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराज आज कोर्टात हजर राहणार का? आणि आपली काय बाजू मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘अमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते’ असे वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कुठे आणी कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर २६ जुन रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले ?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मोगलाई आहे काय? शिवजयंतीवर लागू केलेल्या निर्बंधांवरून फडणवीसांचा संताप

News Desk

“गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असं करायला नको होतं”…रक्षा खडसेंचा पलटवार 

News Desk

भाजपमधून एक्झीट घेत आणखी एक नेता राष्ट्रवादीची वाट धरणार?

News Desk