HW News Marathi
महाराष्ट्र

राम मंदिराच्या पायभरणीचा सोहळा दिवाळीसारखा साजरा करावा मात्र कोरोनाचे भान ठेवावे – चंद्रकांत पाटील

मुंबई | ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी होणार आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे. सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे आणि सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (३ ऑगस्ट) राज्यातील जनतेला व भाजपाच्या कार्यकर्त्यांना केले.

“राममंदिराचे भूमिपूजन आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी मोदीजींच्या हस्ते होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा”, असे पाटील यांनी सांगितले.

“मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, घरावर कंदिल लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा. मात्र, समारंभाचा सामुहिक उत्सव टाळावा. सामूहिक उत्सव साजरा करणार असू तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. सामूहिक उत्सवामध्येसुद्धा कोरोनाचे भान ठेवावे. ढोलताशे आणि फटाके बिलकूल नको”, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, अजित पवारांचे आवाहन

News Desk

भाजपची चौथी यादी, विनोद तावडेंचा पत्ता कट, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसेंना उमेदवारी

News Desk

सरकार चालवताना अडचणी येत आहेत, मुख्यमंत्र्यांचा रोख कोणाकडे?

News Desk