HW News Marathi
महाराष्ट्र

आम्हाला माहीत आहे ४-५ लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा आहे – निलेश राणे

सिंधुदुर्ग | राज्यात कोरोना महामारीच्या काळात एकीकडे रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांमुळे राजकारण तापत आहे. भाजपसह महायुती व अनेक शेतकरी संघटनांनी मिळून दूध उत्पादकांच्या भाववाढीसाठी आक्रमक आंदोलन सध्या पुकारले आहे. २० जुलैला इशारा आंदोलन केल्यानंतर काल (१ ऑगस्ट ) राज्यभरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी अनेक विरोधकांनी सरकारमध्ये असलेल्या पक्षांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी काल राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे.’आम्हाला माहीत आहे चार पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा आहे. पुरावे द्यायची पण गरज नाही कारण जग जाहीर आहे. हा खासदार आहे, म्हणजे आपल्याला कळलं असेल, हा दिल्लीला जाऊन काय करत असेल,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या आमदार, खासदारांवर केली आहे.

काय घडले होते?

राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन काल करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. “हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे”, अशी खरमरीत टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती.

त्यावर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना पलटवार करत उत्तर दिले होते. ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत’, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला होता. या वादात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेत शिवसेनेच्या आमदार, खासदारांवर टीकास्त्र सोडले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर ! भातखळकरांची टीका

News Desk

भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची अडवली गाडी, नार्वेकर म्हणाले, “चला यांना गाडीत टाकून शिवबंधन बांधू”!

News Desk

शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना! – डॉ. नीलम गोऱ्हे

Aprna