HW News Marathi
महाराष्ट्र

“अजित पवार भेसळ करायला लागले असं व्हायचं…” उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला त्या बंद केलेल्या पेट्रोल पंपचा किस्सा

पिंपरी चिंचवड | राज्यात पेट्रोलची किंमत गगनाला भिडली आहे. सामान्य माणसांना ती रक्कम आता परवडण्याच्या पलीकडे गेली आहे. याच पेट्रोल पंपाच्या मुद्यानरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. “१९९१ मध्ये खासदारकीला उभं असताना मी पेट्रोल पंप चालवायला घेतला होता, पण उद्या कुठे भेसळ झाली, तर अजित पवार भेसळ करतो, अशी बोंब व्हायची आणि माझीच बदनामी व्हायची, त्यामुळे मी तो पंप दुसऱ्यांना चालवायला दिला” असा किस्सा सांगत उपमुख्यमंत्र्यांनी हशा पिकवला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या चिंबळी भागात खाजगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.

चिंबळी येथे पेट्रोल पंपाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले,”साखर कारखान्यामार्फत पेट्रोल पंप चालतो. बारामतीमध्ये खरेदी विक्री, दूध संघ, मार्केट कमिटीकडून पेट्रोल पपं चालवले जातात. लोकांचा विश्वास खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, दूध संघ पेट्रोल पंपावर असतो, तिथे भेसळ होणार नाही. त्यामुळे तिथे ग्राहक जास्त असतात. आता भेसळीचे प्रमाण जवळपास संपलं आहे. लोणी काळभोर जिथे पेट्रोल, डिझेल भरलं जात तिथे नवीन टेक्नॉलॉजीनुसार काही गडबड तर होत नाही ना हे पाहिलं जातं. तरी देखील काही जण पेट्रोल सोडताना चिप बदलणं. त्यामुळे लिटर मागे थोडसं पेट्रोल कमी जाईल, अशी चोरी केली जाते. असलं फार काळ चालत नाहीत. एकदा का नागरिकांना समजलं की हा पेट्रोल पंप गडबड करतोय तो ओस पडला म्हणून समाजाच,” असं अजित पवार म्हणाले.

स्वतःच्या पेट्रोलपंपाबद्दलचा किस्साही यावेळी पवारांनी सांगितला. “दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. केंद्र सरकारच्या या काळामध्ये पेट्रोल शंभरी पार गेलं, तर आश्चर्य वाटू देऊ नका, एवढं झपाट्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. शेवटी वाहनं, तर घ्यावीच लागतात. १५ वर्षानंतर वाहन स्क्रॅबमध्ये जाणार आहे. आणखी तो एक नियम आला आहे. अन्यथा आपल्याकडे कितीतरी वर्ष वाहन वापरणारे नागरिक आहेत. असे वेगवेगळे नियम येत असतात. मगाशी आमदार दिलीपराव यांनी सांगितलं असं म्हणत अजित पवार म्हणाले, १९९१ साली खासदारकीला असताना माझा लोणीकंदला पेट्रोप पपं होता. त्या काळात पंपामध्ये भेसळीचे प्रमाण चालायचे. पेट्रोल पंपावर भेसळ झाली, तर अजित पवार भेसळ करायला लागला, असं व्हायचं आणि माझीच बदनामी व्हायची म्हणून तो पेट्रोल पंप बांदल नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला,” असं अजित पवारांनी म्हणाले.

गडकरींच्या १५ वर्षांच्या नियमावरही भाष्य

“सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आता पेट्रोलचे दर शंभरीपार गेले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका, एवढे झपाट्याने हे दर वाढत आहेत, पण वाहनं तर घ्यावीच लागतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं की एक वाहन फक्त 15 वर्ष वापरायचं, 15 वर्षांनी ते वाहन स्क्रॅपमध्ये गेलं पाहिजे. असा नवा नियम आला आहे. नाहीतर आपल्या इथे किती तरी वर्ष वाहनं वापरणारे लोक आहेत” अशा कोपरखळ्या अजित पवारांनी मारल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा केंद्रसरकारवर घणाघात!

News Desk

शांत राहूनही चांगले काम करता येते, त्यासाठी घसा फोडण्याची गरज नसते

News Desk

मुंबई पालिकेत कॉंग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला

News Desk