HW News Marathi
महाराष्ट्र

“येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल”, मनसेचा इशारा  

मुंबई | मनसेने मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची तुलना विरप्पन गँगशी केली आहे. ‘विरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल,’ असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.”विरप्पन नि जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल”, असे ट्विट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी आज (२९ जानेवारी) मनसेची महत्त्वाची बैठक मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये होणार आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखीस उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. मागच्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुखापत झाल्यामुळे ही बैठक आटोपती घेण्यात आली होती.

आज होणाऱ्या बैठकीत पदाधिकाऱ्यांवर जबाबदारीचं वाटप, पक्षवाढीसाठी नवीन योजना, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आंदोलन अशा स्वरुपाची रणनीती आखली जाणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप यांच्यात युती होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. काहीच दिवसांपूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यामुळे या चर्चांनी पुन्हा जोर धरला होता. मात्र, प्रसाद लाड यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ही वैयक्तिक भेट होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण, महापालिकेचा मोठा निर्णय!

News Desk

परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

News Desk

या देशातील कोणतीही तपासयंत्रणा म्हणजे परमेश्वराचा अवतार नसतो!

News Desk