HW News Marathi
Covid-19

अजित पवारांची मंत्रालयात गरज, मात्र मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरायला हवं !

मुंबई | “उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे फायनान्स आणि प्लॅनिंगची जबाबदारी असल्याने फिल्डपेक्षा त्यांची मंत्रालयात अधिक गरज आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरलंही पाहिजे”, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. ‘सीएनएन-न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’हून बाहेर न पडण्यावर जोरदार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर, शरद पवारांनी हे विधान केले आहे.

“अजित पवारांकडे फायनान्स आणि प्लॅनिंगची जबाबदारी आहे. त्यामुळे, त्यांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात काही वाद नाही. विशेषतः मुख्यमंत्रीसर्वांना विश्वासात घेत आहे. मात्र, थोडं फिरलंही पाहिजे. त्याचप्रमाणे, अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांच्यावरही फिल्डवर काम करण्याची जबाबदारी आहे”, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, “अजित पवार, जयंत पाटलांकडे राष्ट्रवादी पक्षची जबाबदारी आहे”, असेही शरद पवारांनी यावेळी म्हटले.शरद पवारांच्या हा सल्ला मुख्यमंत्र्यांना रुचणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?

“मी घराबाहेर पडत नाही असे म्हणणारे विमानापेक्षा बैलगाडीतून का जात नाहीत ? काम करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही. मी घरात बसून राज्यसाठी निर्णय घेत आहे. उलट प्रत्यक्ष भेटीत फक्त एकाच ठिकाणी जाता. मात्र तंत्रज्ञानामुळे आता एकाचवेळी अनेक ठिकाणी जात आहे. तंत्रज्ञानाचा वापरच करायचा नसेल तर मग शोध का लावतात? कोरोनामुळे मंत्रालय बंद आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीका उत्तर दिले आहे. “मातोश्रीतून बाहेर पडून मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे”, असे म्हणत विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरु राहणार! सरकारचा मोठा निर्णय

News Desk

MPSCच्या परीक्षांची तारीख जाहीर!

News Desk

देशात आतापर्यंत 8.40 कोटींहून अधिक कोरोना लसींचे डोस दिले

News Desk