HW News Marathi
Covid-19

राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार ! 

मुंबई | “राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहोत. मात्र, आम्ही एकत्र यायची जरी वेळ आली, तरीही आम्ही यापुढे निवडणुका मात्र एकत्र लढणार नाही”, असे अत्यंत मोठे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. “शिवसेना सध्या हवेत आहे. ते आता सोबत यायला तयार होतील असे वाटत नाही. आम्हाला केंद्राचे आदेश पाळावेच लागतात. त्यामुळे, जर आम्ही एकत्र आलोच तर मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारच घेईल. आम्ही एकत्र आलो तरीही निवडणुका वेगळ्याच लढवणार”, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे मोठे विधान केले आहे.

“आधी एकत्रित निवडणुका लढवून पुढे आपल्या सोयीचं राजकारण करायचं हे योग्य नाही. आधी सोबत निवडणूक लढवायची, २१ खासदार निवडून आणायचे. राज्यातही आमदार निवडून आणायचे. मग आपल्या कमी जागा जिंकूनही सत्तेत निम्मा वाटा मागायचा, असे कसे चालणार ?”, असा बोचरा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. काल (२७ जुलै) महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडली. यावेळी “महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्यासाठी तयारी करा”, असे निर्देश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिले. त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाला’, केंद्र सरकारची कबुली

News Desk

पीएम केअर्स फंडाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

कोरोना पॉझिटिव्ह आमदार चक्क पीपीई किट घालून मतदानासाठी हजर 

News Desk