HW News Marathi
महाराष्ट्र

जयंत पाटलांना व्हायचंय मुख्यमंत्री!

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सांगलीमध्ये एका लोकल चॅनेलला मुलाखत देताना जयंत पाटील यांनी ‘मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे’असं म्हटलं आहे. तुमच्यात मुख्यमंत्री होण्यासाठीचे सगळे गुण आहेत तरीही सतत हे पद हुलकावणी देत आहे असं वाटतं का असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी यावर आपल्या दिमाखदार शैलीत उत्तर दिले आहे.

“आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद सध्या नाही. प्रत्येक राजकारण्याला जशी इच्छा असते तशी माझीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण पक्ष आणि शरद पवार जो निर्णय घेईल तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इतका काळ काम करणाऱ्या माझ्यासारख्या नेत्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझी मतदारी आहे. यासाठी संख्या वाढली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे. ती संख्या जर वाढली आणि मोठा पक्ष झाला तर मग शरद पवार जो निर्णय देतील तो मान्य असेल”, असं जयंत पाटील यांनी या मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे. पुढे त्यांना असंही विचारलं की अजित पवार, सुप्रिया सुळे यापैकी समर्थन कोणाला द्याल, त्यावर ते म्हणाले की, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकच आहेत. पवारसाहेबांच्या घरातील त्या व्यक्ती आहेत त्या एकच आहेत त्यामुळे त्यांना वेगळं समजण हीच मुळात चुक आहे, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, जयंत पाटील यांनी मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे भविष्यकाळात राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढेअसेल का हे पाहावं लागेल.कारण, सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री झाल्या पाहिजे अशी मध्यंतरी मागणी केली जात होती. मात्र, शरद पवारांनी स्वत: सुप्रिया यांना महाराष्ट्रातील राजकारणात इंटरेस्ट नाही असं म्हटलं होते. कारण त्या केंद्रात कार्यरत आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीचा पहिला मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील की अजित पवार ? अशा काही घडामोडीत घडणार का हे पाहावं लागेल. यावर राष्ट्रवादीकडून, शिवसेना आणि कॉंग्रेसकडून तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर विभागातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – मंत्री सुनील केदार

Aprna

‘राष्ट्रवादी’ला विश्‍वासात घेऊन निर्णय घ्या, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला!

News Desk

“ते म्हणतात सरकार चालून तर दाखवा म्हणजे आत्ता आम्ही रांगतोय का? – मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षाला पलटवार

News Desk